पृष्ठे

शुक्रवार, १८ जानेवारी, २०१३

ओळखीने अनोळखी

प्रवासात गाडीमध्ये, बसमध्ये अनेक लोक भेटतात हि ह्यातली काही लोक आपण जसे त्यांना खूप वर्षानुवर्ष ओळखत आहोत अशी गप्पा मारायला लागत त्यामध्ये काहींच्या गप्पांन मध्ये स्वतायचा कामच कौतुक,कधी मुलाचं किवा मुलीचं कौतुक कधी घरातील भांडण,घरातील आपल्या  अनोळखी लोकाशी अगदी मोकळेपणने बोलत असतात..कसलीच भीड न बाळगता आणि कोणतही नातं नसता.. अश्या लोकांच एक नातं  असता अनोळखीपणचं
              ह्या  अनोळखीपणाच त्यांना बोलतं करतो  थोड्या वेळचा प्रवास नंतर कधी कुणी कुणाला भेटणार नसतं त्यामुळे इतर ओळखीच्यापेक्षा आपला मन मोकळं करण्यासाठी  हा पर्याय  निवडतात कारण अनोळखी न कुणाकडे त्याच उणं दुणा काढणार असततं न त्यामुळे कुणाचं नुकसान किवा ह्याने कुणाला सागितलं तर काय अशी भीती देखील नसते..अश्याच एक आजी प्रवासात भेटाल्या आपल्या लेकीकडे चालेल्या अगदी सून कशी वागते पासून जावई कसा आई सारखं वागवतो असा सगळं त्यांनी अगदी पाऊण -एक तास कल्याण ते  सी एस टी सागंत होत्या पण उतरल्यावर बर बेटा येते, तुला काय  सांगत बसले पण बरं वाटलं ..हे अगदी वपुंच्या कथे सारखा झाला पण अशी अनेक ओळखीने
अनोळखी असलेल्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पहिला कि आपल्याला देखील उगाच बरं वाटतं

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Like My Blog