पृष्ठे

शनिवार, १९ जानेवारी, २०१३

"नको मज मुलगी ,मुलगाच हवा माझ्या वंशाला दिवा"

महराष्ट्रामध्ये २०११ च्या जणगणनेनुसार १००० पुरुषाच्या मागे ९४० स्त्रिया आहेत ६ते १० च्या वयोगटातील मुलींचे प्रमाण मात्र १०००:९२२ एवढे आहे .
    मुलींचे प्रमाण २००१ च्या जनगणनेच्या तुलनेत खूपच की आसल्याचे लक्षात येते हि परिस्थिती महाराष्ट्रतच  नाही तर संपूर्ण देशात आहे स्त्रियांचे  कमी होत जाणारे  प्रमाण  
येणाऱ्या पिढ्यांसाठी धोक्याचा संकेत आहे हे धोके कमी करण्यासाठी  स्र्तीभ्रून हत्यासारखी अमानवी कृत्याला वेळीच आळा घालणे गरजेचे आहे स्त्रीभ्रूण हत्या  हा प्रश्न खूप गांभीर्याने घेणे अत्यंत आवश्यक आहे
     समाजामध्ये मुलीचा जन्म नकोसा वाटण्याची मानसिकता बळावत चालली आहे हि मानसिकता निर्माण होण्याची करणे अनेक आहेत त्यापैकी काही कारणे अनेक आहेत त्यापैकी काही कारणे म्हणजे वंशाला दिवा हवा मुलगी हे परक्याचा धन आहे तिच्या शिक्षणावर पालन पोषणावर केलेला खर्च दुसऱ्याचा कामी येतो शिवाय लग्नाचा खर्च हुंडा या सारख्या अनिष्ट चालीरीती एकूणच मुलींचा सांभाळ विशेषता मुलगी वयात आल्यावर तिची घ्यावी लागणारी कळजी हि कारणे स्त्रीजन्माविषयी असलेल्या गैरसमजुती बद्दल दिसून येताता
       नको मज मुलगी ,मुलगाच हवा  माझ्या वंशाला दिवा असा म्हणणाऱ्या पुरुष्यापेक्षा  स्त्रियांची संख्या जास्त आहे.एकीकडे असा म्हणणाऱ्या सासवा जास्त आहे  तर मुलगी मुलगा भेद मानणाऱ्या स्त्रिया  देखील समाजात आहे परंतु आपला समाज हा पुरुषप्रधान आहे असे दिसून येते तेव्हा पुरुष मंडळी स्त्रियांना गर्भलिंग निदान चाचणी करून घ्यावयास भाग पडत्तात या उलट परिस्थिती अशी कि जर एखाद्या स्त्रीला पहिले अपत्य मुलगी झाले असेन तर दुसरे अपत्य मुलगा व्हावा अशी अपेक्षा असते
      मुलगा कि मुलगी हे अगदी सहा आठवड्यात गर्भ असतानाच सोनोग्राफी तंत्रज्ञानद्वारे समजते वास्तविकता हे तंत्रज्ञान गर्भाची वाढ कशी होते आहे  आणि गर्भात काही दोष तर नाही ना  हे जाणून घेण्यासाठी गरजेचे आहे परंतु या  तंत्रज्ञानचा दुरुपयोग करून गर्भाशयात वाढणाऱ्या भ्रूणचे लिंग कोणते आहे हे जाणून घेतले जाते आणि गर्भ जर स्त्री चा असेन तर ती कोवळी नाजूक काळी खुडण्याचे कारस्थान तिच्याच आई वडलांकडून आणि इतर नातेवाईकाकडून केले जाते स्त्रियांना समाजात समानतेची वागणूक मिळत असताना देखील काही स्त्रिया पुरुषांच्या दाबबाला बळी पडताना दिसतात
        मानवाधिकार कायद्यानुसार स्त्रियांना स्वतःच्या गर्भात वाढणाऱ्या बालकाला जन्म द्याच कि नाही हा हक्क आहे त्या हक्काचा उपयोग करण्यासाठी स्त्रिया पुढे धजावत नाही कोल्हापूर जिल्ह्यातील सेव थे बेबी गर्ल हि जिल्हाधिकार लक्ष्मीकांत देशमुख यांनी हीही जिल्हा पटली वर राबवून जिल्ह्यातील  सर्व सोनोग्राफी केंद्रे ऑनलाईन  करून घेतली  त्यमुळे जिल्ह्यातील स्त्रीभ्रूण हत्यचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते
        सुदाम आणि सरस्वती मुंडे यांनी बीड जिल्ह्यात गेली  २५ वर्ष स्त्रीभ्रूण हत्या करण्याचा  धंदा केला त्या दरम्यान त्यांनी ४०तें ४५ हजार स्त्रीभ्रूण हत्या केल्याची आकडेवारी उघडकीस आली आहे
स्त्रीभ्रूण हत्या करण्यावर  अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची तरतूद असताना देखील डॉक्टर्स स्त्रीभ्रूण हत्या करण्यास धजावता यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे या मध्ये फक्त डॉक्टर्स जबाबदार आहेत असे म्हणून चालणार नाही त्यस गर्भलिंग चाचणी करण्यासाठी गळ घालणारे समाजातील काही दांपत्या हि तितकेच जबबदार आहेत तेव्हा स्त्रीभ्रूण हत्यचे खापर डॉक्टर्स वर न फोडता समाजातील विकृत दाम्पत्य वर सुद्या कायद्याची चपराक बसवून गुन्ह्यात सापडणाऱ्या दाम्पत्यावर देखील अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात यावे तरच स्त्रीभ्रूण हत्यासारखी समाज मानस लागलेली कीड संपुष्टात येण्यास मदत येईल  अशी अशा

जात- धर्म -माणुसधर्म

 पुण्यातील  जंगली महाराज रोडवर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या वेळची गोष्ट आहे ..स्फोटाची बातमी सगळीकडे पसरतच शोध पथकच काम सुरु झाला, ट्राफिक जम झाला होता कसबसे म न पा पर्यंत पोहचले पण नंतर उशीर होता होता म्हणून बस मधून उतरून थोड चालत जाऊन रिक्षा बघत होते तर दोन माणसं  रिक्षेत बसली आणि लगेच  उतरताना दिसली..ह्या घटनेमुळे रिक्षावाल्याने आपल्याला मिळणारं भाडं सोडून घरी जाणायच ठरवलं होता..जवळ आसपास रिक्षा दिसत नव्हती  पण त्याला  टिळक रोड  जाणार का म्हणाल्यावर तो लगेच तयार झाला....रिक्षात बसल्यावर त्याने घातलेली  टोपी काढली आणि  मराठी  मिश्रित हिंदीतून बोलायला लागाला.  आप थी  इसलिये मैने भाडा लिया वरना  पेहेले का भाडा छोड दिया मैने और जाने वाला अभी एफ़्तर कर के आया सोच एक दो ट्रीप  मार दु लेकिन ऐस कुछ हो जाता ही और हमारे धंदे कि खोटी होती ही ..
             एसे कुछ  हो जाता ही तो टोपी उतार के राखता हु मैन या घर चला जाता हु डर लागता है,करता कोई है  और  शक सब पे  , काही पे दंगे होते काही पे  कुछ  अगर धर्म के नाम पे कुछ होता ही तो लोग भी एक शक कि नजर से देखते है. एक आप लेडीज दिखी सोचा मेरी बेटी बेहेन होती तो इसलिये आपको  हां  कहा
         हे  सगळ तो बोलत असतान अधून मधून घरून इकडून तिकडून कुठेस पोह्चालीस का? फोन येत होते ते त्यांनी ऐकले म्हणाला घरी फोन करा निट पोहचले म्हणून त्यावेळी  टोपी बघून दाढी बघुन संशय घेणाऱ्या व  धर्म पाळणाऱ्या लोकांपेक्षा त्या रिक्षेवाल्याचा माणुस धर्म मला भावला
 
 

शुक्रवार, १८ जानेवारी, २०१३

ओळखीने अनोळखी

प्रवासात गाडीमध्ये, बसमध्ये अनेक लोक भेटतात हि ह्यातली काही लोक आपण जसे त्यांना खूप वर्षानुवर्ष ओळखत आहोत अशी गप्पा मारायला लागत त्यामध्ये काहींच्या गप्पांन मध्ये स्वतायचा कामच कौतुक,कधी मुलाचं किवा मुलीचं कौतुक कधी घरातील भांडण,घरातील आपल्या  अनोळखी लोकाशी अगदी मोकळेपणने बोलत असतात..कसलीच भीड न बाळगता आणि कोणतही नातं नसता.. अश्या लोकांच एक नातं  असता अनोळखीपणचं
              ह्या  अनोळखीपणाच त्यांना बोलतं करतो  थोड्या वेळचा प्रवास नंतर कधी कुणी कुणाला भेटणार नसतं त्यामुळे इतर ओळखीच्यापेक्षा आपला मन मोकळं करण्यासाठी  हा पर्याय  निवडतात कारण अनोळखी न कुणाकडे त्याच उणं दुणा काढणार असततं न त्यामुळे कुणाचं नुकसान किवा ह्याने कुणाला सागितलं तर काय अशी भीती देखील नसते..अश्याच एक आजी प्रवासात भेटाल्या आपल्या लेकीकडे चालेल्या अगदी सून कशी वागते पासून जावई कसा आई सारखं वागवतो असा सगळं त्यांनी अगदी पाऊण -एक तास कल्याण ते  सी एस टी सागंत होत्या पण उतरल्यावर बर बेटा येते, तुला काय  सांगत बसले पण बरं वाटलं ..हे अगदी वपुंच्या कथे सारखा झाला पण अशी अनेक ओळखीने
अनोळखी असलेल्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पहिला कि आपल्याला देखील उगाच बरं वाटतं

दोस्ती /मैत्री /friendship

 दोस्ती /मैत्री /friendship

 रक्ता
च्या नात्यांनंतर माणसाने  जोडलेले असे एक खास नातं असते  यात  कधी आईची काळजी वडलांचा धाक भावंडांसारखा समजूतदार आणि खोडकरपणा असतो हे सगळं  असून हि त्यात त्या नात्यांची आपली अशी एक खास बात असते.यात  first impression is last impression न मानता  दुसरी संधी दिली जाते  त्या दिलेल्या संधीचा अनेक वेळा त्रास होत असताना हि तो सहन करून  नातं जपणं हि या नात्याची खासियत असते.जीवास जीव देणार ...घासातला  घास काढून ठेवणार मैत्रीचं नातं ..
                या नात्याची एक वेगळी मजा असते यात कोणता अस बंधन नसतं तरी पण एक नाजूक रेशमी बंध असतो.
यात वयाची मर्यादा नसते ना स्त्री -पुरुष भेदभाव, गरज असते ती   भांडत भांडत का होईना पण परस्परांना समजून घेण्याचा  समजूतदा पणाची ......
                

Like My Blog